नागांव ग्रामपंचायत

अष्टागरमधील एक असे नागांव मनात वसे

अलिबागच्या दक्षिणेस सुमारे ३ मैलावर असलेले नागांव समुद्रकिनारी वसलेले आहे. त्याच्या उत्तरेस व पूर्वेस साखरची खाडी आहे. दक्षिणेसहि समुद्राचे पाणी भरतीच्या वेळी पसरून नागांवास बेटाचे स्वरूप प्राप्त होई. आता एवढे बदल झाले आहेत की, नागांव पूर्वी बेट होते हि गोष्ट लक्षात येत नाही. नागांवच्या दक्षिणेस सहा मैलांवर इतिहास प्रसिद्ध चौल बंदर आहे. अलिबाग तालुक्याच्या किनारपट्टीवरील रेवदंडा, चौल, नागांव, आक्षी, वरसोली, थळ, किहीम आवास या गावांना अष्टागर म्हणतात. नागांव ध्यांनी येण्यासाठी आक्षी नागांव असा जोड उल्लेख करतात.
300+ विकास
कामे

सौ. हर्षदा निखील मयेकर (एम . बी . ए . )

सरपंच

महाराष्ट्र भाषेचा कोश ज्या पंडितांनी १८२९ मध्ये प्रसिद्ध केला त्याचे मुख्य जगन्नाथ शास्त्री कमवंत हे नागांव येथील होते. अलीकडे हे घराणे टिल्लू या नावाने प्रसिद्ध आहे. त्यांचे मदतनिस गंगाधर शास्त्री फडके हेही नागांवचे या मंडळातील परशुरामपंत तात्या गोडबोले वगळले तर इतर म्हणजे रामचंद्र शास्त्री जानवेकर, दाजी शास्त्री शुक्ल हे नागांवचेच. आधुनिक मराठी भाषेचे जनक समजले जाणारे व ज्यांनी इसापनीती बालमित्र वगैरे ग्रंथांची सुंदर भाषांतरे केली ते सदाशिव काशिनाथ छत्रे हे नागांवचेच होते.

जवळपासची ठिकाणे

नयनरम्य वास्तू

नागांवचे मूळनाव नागग्राम असावे कारण नागांवात शिरल्यावर लगेच एका वाडीत नागांच्या आकृती खोदलेले नऊ शिल्प आहेत, त्यावरून नाग गाव नागांव झाले असावे. नागांव येथील नागेश्वराच्या मंदिरातील नाग शब्दावरूनही नागांव नाव पडले असावे.

स्वच्छ नागांव , सुंदर नागांव