शेतकरी आहे अन्नदाता, तोच आहे देशाचा खरा भाग्यविधाता ग्रुप ग्राम पंचायत नागाव येथे 1 जुलै - कृषी दिना निमित्त तालुकास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर शेतकरी चर्चा सत्रामध्ये पीक लागवडीच्या विविध पद्धती त्यावर कीड रोग नियंत्रण या संदर्भात कृषी विज्ञान केंद्र येथील शास्त्रज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित शेतकऱ्यांना मोफत १ पाकीट बियाण्यांचे वाटप करण्यात येणार आले.त्यामध्ये मिरची , चवळी, भेंडी पालक इत्यादी बियाणे आहे. कार्यक्रमासाठी रायगड जिल्हा कृषी अधिकारी शिंदे मॅडम व त्यांचे सर्व कृषी विभाग सहकारी , ग्राम पंचायत नागाव च्या सरपंच सौ हर्षदा मयेकर व ग्राम विकास अधिकारी सौ श्वेता कदम मॅडम व सर्व सदस्य तसेच नागाव सह तालुक्यातील इतर ग्रामपंचायतीतील 300 हून अधिक शेतकरी बंधु भगिनी उपस्थित होते . शेती खात्यातील विविध योजना स्पर्धा मधील प्रमाण पत्र वाटप करण्यात आली तसेच निखिल मयेकर मित्र मंडळा तर्फे उपस्थित शेतकरी बांधवांना मोफत सुपारीच्या रोपांचे वाटप करण्यात आले.
उपक्रमाची तारीख
उपक्रमाचा प्रकार